Devgad College

 

News

 

 

शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड येथे २४ एप्रिल, २०२६ रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. सदर मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधूदुर्ग, श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये सिंधूदुर्ग व इतर जिल्ह्यातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करावी.