Events


News

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये संत राऊळ महविद्यालय, कुडाळ येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीत जास्तीत जास्त कलाप्रकारात बाजी मारून सिंधुदुर्ग विभागीय सर्वसाधारण विजेते पद देवगड महाविद्यालयाने पटकावले. दि. २८ जुलै २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या सर कावसाजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या सत्कार समारंभामध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. सुनील भिरूड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनरल सेक्रेटरी, असोसिएशन ऑफ इंडिअन युनिव्हर्सिटीस, नवी दिल्लीच्या डॉ. पकंज मित्तल यांच्या शुभ हस्ते महाविद्यालयाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर समूह गायन आणि कव्वाली या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याला डॉ. पकंज मित्तल यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजन समिती सदस्य तसेच सिंधुदुर्ग विभाग सांस्कृतिक सहसमन्वयक डॉ. नितीन वळंजू यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे तसेच शिक्षण विकास मंडळ, देवगडचे सभापती आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सांस्कृतिक विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवात देवगड महाविद्यालयाची बाजी…! विविध १४ स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर निवड मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवाचे आयोजन आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे करण्यात आले होते. विभागीय स्तरावरील या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व म्हणजे एकूण ३७ महाविद्यालये सहभागी झाली होती. शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी नावलौकिक असलेल्या देवगड मधील श्री. स. ह.केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या महोत्सवामध्ये विविध स्पर्धांमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत आपल्या कलापूर्ण सादरीकरणाने उज्ज्वल यश संपादित केले. देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या २३ कलाप्रकारापैकी एकूण १४ कलाप्रकारात आपले यश संपादन केले. प्रथम क्रमांक – १. शास्त्रीय संगीत – सुधांशू सोमण, २. समूह गीत गायन- सुधांशू सोमण, श्रीश वाळके, यश तेली, दीपाली गोगटे, श्रमिका हिंदळेकर, सानिका पाटणकर, ३. विडंबन नाट्य – आकाश सकपाळ, ओम मिठबांवकर, शिवानी खवळे, श्रावणी गांवकर, प्रतिक चव्हाण, साहिल दिलीप जाधव, ४. मूक नाट्य - आकाश सकपाळ, ओम मिठबांवकर, प्रतिक चव्हाण, साहिल दिलीप जाधव, साहिल दीपक जाधव, दीप्ती जोशी, ५. रांगोळी – सर्वेश मेस्त्री द्वितीय क्रमांक – १. नाट्य संगीत - सुधांशू सोमण, २. कथाकथन – नुपूर लळीत, ३.एकपात्री अभिनय – ओम मिठबांवकर, ४. चित्रकला- गौरव सुतार तृतीय क्रमांक – १. स्वर वाद्य- सुधांशू सोमण, २. एकांकिका (मराठी)- आकाश सकपाळ, ओम मिठबांवकर, दीप्ती जोशी, फईजा काझी, शिवानी खवळे, श्रावणी गांवकर, सुधांशू सोमण. उत्तेजनार्थ – १. ताल वाद्य – संकेत घाडी, २. लोकनृत्य- सुधांशू सोमण, संकेत घाडी, रितेश राणे, मयुरी कुबल, श्रावणी गांवकर, दीपाली गोगटे, रेणुका गांवकर, श्रद्धा राणे, गौतमी तेली, विना कदम, ३. मूर्ती कला- गौरव सुतार या विद्यार्थ्यांची पुढे होणाऱ्या विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे, शिक्षण विकास मंडळ, देवगडचे सभापती आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या 55 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या महाअंतिम फेरीमध्ये On the spot painting या कला प्रकारामध्ये कु. गौरव सुतार यास उत्तेजनार्थ तसेच Clay Modeling (मातीकाम) या कला प्रकारामध्ये सुवर्ण पदक हे बक्षीस प्राप्त झाले आहे.  

ऑल इंडिया G.V.Mavlankar शूटिंग चॅम्पियनशिप मधून SUO प्रतिक घाडीगांवकरची राष्ट्रीय पातळीवर निवड  

देवगड महाविद्याल्यातील DYF 2022-23 च्या वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन  

देवगड महाविद्यालयाच्या NCC विभागाची JUO रेणुका विलास राणे हिची अग्नीवीर GD (महिला मिलिटरी पोलीस) मध्ये निवड...  

देवगड महाविद्यालयाच्या सुधांशु सोमण याची मुंबई विद्यापीठाकडून समूह गीत प्रकाराच्या स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी  


JanFebruary 2025Mar
SunMonTueWedThuFriSat
2627282930311
2345678
9101112131415
16171819202122
2324252627281
2345678