Events

Events

One Day Workshop on SET NET
Workshop Under MoU with Pillai College, New panvel.
One Day workshop on Application of Research Methodology in Social science, Commerce, management and Science. Resource person:- Dr. Santoshkumar Yadav from Devchand College Arjunnagar.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा -तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन
Devgad College's second year cadets Rushikesh Teli won gold medal at Mumbai University powerlifting competition. His total lift is: 587.5 kg.
कु. धनराज मंगेश घाडी (TY BSc.IT)याने तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात आणि कु. युवराज नाना जोई्ल ( M.Com.II) याने गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले
Department of B.Com. Banking & Insurance of Shri. S. H. Kelkar College Devgad, Dist. Sindhudurg has organized Bank Nationalised Day program on July 19, 2023. Details of the activities conducted are as below: 1) PPT Presentation 2) Quiz Competition 3) Game on Personality Development Best PPT Presentation : 1) Divya Bhave - TYBBI Best Pair of BND 2023 : 1) Shravani Poyrekar - TYBBI 2) Siddhi Ghadi - TYBBI Winner Team of BND 2023 : TYBBI Class
देवगड महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग आणि मालवण येथील पर्यावरणप्रेमी गट इकोमेटस् यांच्यकडून निसर्ग विहार आणि पर्यावरण संवर्धन जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन दि. २४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. सदर उपक्रमामध्ये पक्षी निरीक्षण तसेच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, प्रदूषण आणि नजिकच्या भविष्यातील पर्यावरण संबंधी आव्हाने, पृथ्वीवरील रहिवासी म्हणून माणसाची निसर्गाप्रती जबाबदारी इ. विषयांवर चर्चा व मार्गदर्शन इकोमेटसच्या कार्यकर्त्यांनी केले.
स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड मध्ये वृक्षांचे रक्षाबंधन संपन्न
देवगड महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विठू नामाच्या जय घोषात ज्ञान दिंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा
दि. 26 जून 2023 रोजी श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड येथे राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करियर कट्टा उपक्रमाचे महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी चे फलक अनावरण व विद्यार्थी नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
देवगड महाविद्यालयामध्ये आतंरराष्ट्रीय योग दिवस साजरा. महाविद्यालयाचे NCC unit, NSS आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये आतंरराष्ट्रीय योग दिवस निमित्त योग, प्राणायाम प्रशिक्षण आणि सराव सत्राचे आयोजन करण्यात आले होते. देवगड येथील पतंजली योग केंद्राच्या मा. खाडिलकर यांनी उपस्थितांना नियमित योगाभ्यास आणि प्राणायामचे महत्व विषद करून योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच या सत्रास उपस्थित विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि योगासने प्राणायाम यांचे प्रशिक्षण घेतले.
बारावी परीक्षेत श्रीमती. एन. एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगडच्या विद्यार्थ्यांचे सुयश
माणसाला मिळालेल्या पदामुळे नाही तर त्याच्या कामामुळे त्याची ओळख निर्माण होते.’ उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांचे प्रतिपादन
देवगड महाविद्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्र आणि युनियन बँक ऑफ इंडिया आयोजित ' मी उद्योजक बनणार ! ' या शासकीय योजना आणि बँक कर्ज प्रस्ताव याबद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
महात्मा जोतिराव फुले जयंती
देवगड महाविद्यालयामध्ये ' अणूउत्सर्जन आणि भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे फायदेशीर परिणाम ' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
देवगड महाविद्यालयात इयत्ता 12वी गुणवंत विद्यार्थी सोहळा उत्साहात संपन्न* 💐 शैक्षणिक वर्ष २०२१/२२ मध्ये संपन्न झालेल्या *उच्च माध्यमिक विभागातील *इयत्ता १२वी* च्या परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देवगड कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला.
देवगड महाविद्यालयात योग दिवस २०२२ उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा विभाग, रा.से.यो. आणि NCC युनिट यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त २१ जून २०२२ रोजी योगासन आणि प्राणायाम सराव सत्राचे आयोजन केले. योग दिवसाच्या निमित्त महाविद्यालयामध्ये २५ एप्रिल आणि २० जून रोजी सराव वर्ग घेण्यात आले होते. या सत्रांमध्ये देवगड येथील धन्वंतरी क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राचे डॉ. मुकुल प्रभुदेसाई आणि डॉ. रमा प्रभुदेसाई यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांना आसने, प्राणायाम, ध्यान याचे प्रशिक्षण दिले तसेच सराव करवून घेतला.
दि. ०१/०७/२०२२ कृषी दिनानिमित्त देवगड महाविद्यालयात वृक्षारोपण महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून देवगड महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. देवगड महाविद्यालय आणि सिंधदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, सिंधदुर्ग यांच्यातील सामंजस्य करार झाल्यानंतर पहिला कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला
देवगड महाविद्यालयात भूगोल, विज्ञान व निसर्ग मंडळातर्फे खारफुटी वन भेटीचे आयोजन
देवगड महाविद्यालयात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अजित लिमये व प्रवीण सुलोचन यांनी हृदयविकाराचा झटका यावर उपाययोजना याची माहिती करून दिली. तसेच CPR चे ज्ञान दिले. विद्यार्थ्यांनी देखील यात सक्रिय सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. सुखदा जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
देवगड कनिष्ठ महाविद्यालयात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी संपन्न
देवगड महाविद्यालयात भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
देवगड कॉलेज NCC युनिट आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रकाश तेंडुलकर (अध्यक्ष सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग) आणि जिल्हा सहसचिव श्री. रविकांत चांदोसकर, जिल्हा कार्यकारिणी श्री. सदस्य विजयकुमार जोशी, जिल्हा कार्यकारिणी सल्लागार श्री. उद्धव गोरे, श्री. देवगड सचिव प्रकाश जाधव उपस्थित होते.
देवगड महाविद्यालयात 'जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर 2022' उत्साहात साजरा*
महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 57 व्या "पुरुषोत्तम करंडक" आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका राज्यस्तरीय स्पर्धा, या स्पर्धेमध्ये रत्नागिरी केंद्र या ठिकाणी संपन्न झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'Do or Dry' या एकांकिकेचे सादरीकरण केले होते,
देवगड महाविद्यालयात ' मोबाईलचे फायदे व तोटे' या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन
NCC Cadets चा Army Attachment Camp मध्ये सहभाग देवगड कॉलेज NCC Unit च्या सार्जंट आशुतोष शिंदे, कॉर्पोरल रोहित कणेरकर, कॅडेट सुशांत तेली आणि कॅडेट प्रकाश भिसे यांना पुण्यातील Aundh Military Station येथे Army Attachment Training Camp मध्ये सहभागी होण्याची संधी 58 MAH BN, Sindhudurg कडून मिळाली. हा कॅम्प दि. २६ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबर या कालावधी मध्ये घेण्यात आला. या कॅम्पमध्ये कॅडेट्सना लष्करी आणि शस्त्र प्रशिक्षण दिले जाते. कॅडेटस् ना Army मधील दैनंदिन वातावरणाचा अनुभव देण्यासाठी, आत्मविश्‍वास आणि सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अशा कॅम्पचे आयोजन NCC कडून केले जाते.
देवगड महाविद्यालयात प्राध्यापकांकरिता Professional Ethics यावर व्याख्यान आयोजित*
देवगड महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सोनेरी 🥇 चंदेरी🥈 झळाळी !* राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आंतर विश्वविद्यालय सांस्कृतिक स्पर्धांसाठी कु.सुधांशू समीर सोमण व कु. दिपाली भरत गोगटे यांची मुंबई विद्यापीठाच्या संघात वर्णी !
देवगड कॉलेज NCC Unit च्या कॅडेटस् चा 'एक भारत श्रेष्ठ भारत ' मध्ये सहभाग कॉर्पोरल श्रावणी कुडपकर आणि लान्स कॉर्पोरल वृषाली पांचाळ यांनी 'एक भारत श्रेष्ठ भारत' या NCC च्या राष्ट्रीय पातळीवरील कॅम्पमध्ये 58 MAH BN, Sindhudurg चे प्रतिनिधीत्व केले. हा कॅम्प ओडिशा राज्यातील रुरकेला येथे दि. 3 ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये पार पडला. राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी राज्यांमधील सांस्कृतिक देवाण-घेवाण महत्वाची असते. या दृष्टिकोनातून एक भारत श्रेष्ठ भारत या कॅम्पचे आयोजन NCC कडून केले जाते.
सागर सुरक्षा अभियान 2022 च्या निमित्ताने, 12 नोव्हेंबर 2022 रोजी NCC युनिटने देवगड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. एन. जी. बगळे यांचे सागरी सुरक्षा अभियानाबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित केले.
देवगड महाविद्यालयात ‘भारतीय संविधान दिन - 26 नोव्हेंबर 2022’ उत्साहात साजरा
देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या यशाचा ' आविष्कार '.
Mission Puneet Sagar: Wetlands Day यावर्षीच्या पाणथळ प्रदेश दिनाच्या It's Time for Wetlands Restoration या संकल्पनेस अनुसरून Devgad College NCC UNIT आणि वनस्पती शास्त्र विभागाने कांदळवन वनस्पतींची तारामुंबरी किनाऱ्यावर लागवड करून हा दिवस १ फेब्रुवारी २०२३ दिवशी साजरा केला.
उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वश्रुत सुप्रसिद्ध अशा मुंबई मधील St. Xevier's महाविद्यालांमधील M.Sc. Botany चे विद्यार्थी आणि शिक्षक यांची सामंजस्य करारातून देवगड महाविद्यालयास दि. ३१ जानेवारी - १ फेब्रुवारी दरम्यान भेट!
देवगड महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. मराठी भाषा विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ' सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्रत्येकाचे माणूसपण जागवणे हाच महिला दिनाचा खरा उद्देश - देवगड महाविद्यालयामध्ये नवीन विचारांची मुहूर्त मेढ…
DYF 2019
DYF 2018
Devgad youth festival 2019
Devgad youth festival 2022-23
सागर सुरक्षा अभियान 2022 च्या निमित्ताने, 12 नोव्हेंबर 2022 रोजी NCC युनिटने देवगड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. एन. जी. बगळे यांचे सागरी सुरक्षा अभियानाबाबत मार्गदर्शन सत्र...
शिक्षण संस्थांची नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भाने तयारी या विषयावर देवगड महाविद्यालयाच्या IQAC ने आयोजित केलेले चर्चासत्र ३ डिसेंबर २०२२
Calendar 2022-23
Calendar 2021-22